चोपडा (प्रतिनिधी) संत शिरोमणी आचार्य १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या प्रेरणेने मूळनायक श्री १००८ भगवान चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिराचा कामाचे भूमिपूजन समारंभ बुधवार दि. ३ जुलै २०१९ रोजी दुपारी संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम अक्षयसागरजी महाराज यांच्या सानिध्यात संपन्न होणार असून याचा लाभ दिगंबर जैन समाजाने घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
चंद्रप्रभू भगवानजीचे हे मंदिर सुमारे २०० वर्षापूर्वीचे असून या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात येणाèया या मंदिराचा परमपूज्य अक्षयसागरजी महाराज परमपूज्य नेमीसागरजी महाराज व श्रुल्लकरत्न संमताभूषणजी महाराज यांच्या पावन सानिध्यात होणार असून प्रतिष्ठाचार्य वाणीभूषण बालब्रह्मचारी विनयभैय्या-बंडा, मध्यप्रदेश, बालब्रह्मचारी तात्याभैय्याजी, कुंथलगिरी, बाल ब्रह्मचारी अजय भैय्याजी हे प्रतिष्ठा करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबईचे दिलीप घेवरे, डॉ. सुहास शहा, बारामतीचे वालचंद संघवी, पुण्याचे डॉ. कल्याणजी गंगवाल, सुरेश जैन, नयना शहा, दिलीप चौघुले, नितीनकुमार शहा, अमर गांधी, बिपीन दौंडल, विजय जैन, सतिष जैन, मोहनलाल जैन, राजेशभाई जैन, राकेश जैन, अजित जैन, रमेश जैन, भपालजी दौडल, विजेंद्र जैन, जितेंद्र जैन, सुभाष जैन, अजित लोहाडे, संतोष गंगवाल, दिलीप अजमेरे यांच्यासह राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सकाळी ७.३० वाजता भगवंताचा अभिषेक त्यानंतर शांतीविधान व जाप अनुष्ठाण होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता शिलान्यासाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास सकल दिगंबर जैन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चोपडा येथील सकल दिगंबर जैन समाज, जागृती महिला मंडळ, ओम नवयुवक मंडळ यांनी केले आहे.