वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये, त्यांचे काम लवकर व सोयीचे व्हावे, यासाठी भारतीय स्टेट बैंक, सेन्ट्रल बँकांसह इतर बँकांकडून काही ग्राहक सेवा केंद्र व काही खासगी ठिकाणी मनी ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहक सुविधा केंद्राचे बीसी पॉईंट देण्यात आले आहे. पैसे टाकणे, काढणे, खाते उघडण्यासारख्या सेवा पुरविल्या जातात. परंतु, ग्राहक सेवा केंद्र चालकांना बँकाकडून ग्राहकांच्या विविध कामांचा मोबदला म्हणुन कमीशन मिळत असतांना अव्वाच्या सव्वा दाम घेऊन ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप करत येथील राष्ट्रवादीचे महेश सोनवणे यांनी सेन्ट्रल बँकेचे वरणगाव शाखा उप व्यवस्थापक विवेक भगतकर यांचेकडे तक्रार केली आहे.
वरणगाव व ग्रामिण भागात बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये, त्यांचे काम तात्काळ व सोयीचे व्हावे यासाठि ग्राहक सेवा केंद्र बीसी पौईटचे (मीनी बॅंक ) नियोजन येथील बँकांनी केले आहे. आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र हीच सुविधा आता नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. वरणगाव येथे आपल्याच खात्यामधून पैसे काढायचे म्हटल्यावर एक हजार रूपयां मागे ग्राहकांजवळून अगावऊचे दहा रूपये वसूल केल्या जात असल्याचे सर्वच बीसी पॉईंटवर पाहवयास मिळत आहे. त्यामुळे ग्राहक सेवा केंद्रावरच ग्राहकांची लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. एक हजार रूपयांची देवाण- घेवाण केल्यास ग्राहकांजवळून १० रुपये जास्तीचे घेण्याचा प्रकार सुरू आहे. १० हजार रूपयाचा व्यवहार केला, तर शंभर रूपयाचा भुरदंड ग्राहकाला बसत आहे. याच अनुशंगाने महेश सोनवणे यांनी परफेक्ट ग्राहक सेवा केंद्राच्या संचालीका योगीता निलेश पाटिल यांची तक्रार सेन्ट्रल बँकेचे वरणगाव शाखा उप व्यवस्थापक विवेक भगतकर यांचेकडे केली आहे.