Home Cities चाळीसगाव लोंढे विकासोची निवडणूक झाली बिनविरोध

लोंढे विकासोची निवडणूक झाली बिनविरोध

0
84

चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील लोंढे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम यांच्यासह १३ संचालकांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

चाळीसगाव तालुक्यातील लोंढे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यात भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, प्रफुल्ल भोसले, राजेंद्र पाटील, जगन पाटील, नामदेव राणे, अशोक पवार, रतिलाल पाटील, साहेबराव पाटील, भाऊसाहेब रावते, सिंधुबाई भोसले, ज्योती निकम, रमेश निकम आणि गौतम पगारे असे १३ संचालक सदस्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 

 

 


Protected Content

Play sound