जळगाव (प्रतिनिधी)। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात झालेल्या मतदानात जळगाव मतदारसंघात सरासरी 56.11 टक्के तर रावेर मतदारसंघात 61.40 टक्के मतदान झाले. एकूणच जिल्ह्यात मतदानात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. जिल्ह्यातील मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, ते आपणास २३ मे रोजीच्या निकालातूनच कळणार आहे.
जळगाव मतदार संघात झालेले मतदान :-
* जळगाव शहर :- 49.14 टक्के
* जळगाव ग्रामीण :- 60.45 टक्के
* एरंडोल :- 59.37 टक्के
* अमळनेर :- 53.50 टक्के
* पाचोरा :- 57.80 टक्के
* चाळीसगाव :- 58.20 टक्के
रावेर मतदार संघात झालेले मतदान :-
* रावेर :- 65.82 टक्के
* भुसावळ :- 52.39 टक्के
* चोपडा :- 61.29 टक्के
* जामनेर :- 60.04 टक्के
* बोदवड :- — टक्के
* मुक्ताईनगर :- 62.68 टक्के
* मलकापूर :- 67.01 टक्के