चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पिलखोड येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ‘आई फाऊंनडेशन’ यांच्यावतीने आज (दि.२३) लोकमान्य टिळक यांची जयंती व वनसंवर्धन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अ.ना. वाघ होते तर प्रमुख पाहूणे डॉ.विनोद कोतकर उपस्थित होते.
सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ९ वी ते १२ वी पर्यंत मुलामुंलीचे हिमोग्लोबीन तपासणी व धनुर्वात लसीकरण करण्यात आले. डॉ. कोतकर यांनी आपल्या मनोगतातून आरोग्याची काळजी, व्यसनापासुन होणारे गंभीर परिणाम याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास सुधीर चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी आई हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या १० बालकांच्या हातून त्यांच्याच घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख प्रशांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.एफ.बी. चव्हाण यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.