जळगाव, प्रतिनिधी | ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी व पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानिमित्ताने लोकमान्य टिळकांच्या जीवनपट कार्याविषयी ६५ विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकट केला. यात ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांमधून भार्गवी हेमंत ठाकूर, लोचन मिलिंद भोळे, कृष्ण्गीरी प्रमोद्गिरी गोसावी यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. चैतन्या सपकाळे व गायत्री पाटील या विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आधारित माहिती सांगितली. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक रोशनी रवींद्र पाटील द्वितीय युक्ता सुनील पाटील तृतीय गौरव नितीन पाटील या विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली. शिवानी नाईक हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रतिभा लोहार, वर्षा राणे, बी. एड. अंतरवासिता कोमल वाघुळदे, नीलिमा इंगळे प्रतीक्षा परदेशी सुचिता शिरसाठे, एस. एल. भोळे यांचे सहकार्य लाभले.