नवी दिल्ली -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । लोकसभा निवडणूक संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता बाबत शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिले आहे. याबाबत लोकसभा निवडणूक २०२४ चे वेळापत्रक देखील शनीवारी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी दुपारी बैठक घेण्यात आली. ही बैठक ४५ मिनीटे चालली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखासंदर्भात माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यासोबतच उद्या दुपारनंतर देशभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशातील लोकसभा निवडणूक आठ टप्प्यात होण्याची शक्यता असून साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे. या सोबत काही राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या तारखाही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.
काय आहे आदर्शन आचारसंहिता !
निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही. तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.