Home क्राईम हनी ट्रॅपमध्ये लोढाने केली 200 कोटींची वसुली : वडेट्टीवारांचा सनसनाटी आरोप

हनी ट्रॅपमध्ये लोढाने केली 200 कोटींची वसुली : वडेट्टीवारांचा सनसनाटी आरोप


मुंबई-वृत्तसेवा | बलात्कार प्रकरणी कारागृहात असलेल्या प्रफुल्ल लोढा याने हनी ट्रॅपच्या विविध प्रकरणांमध्ये तब्बल 200 कोटींची वसुली केल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

जामनेर येथील रहिवासी तथा भाजपचा कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा हा सध्या राज्यातील हनी ट्रॅपच्या वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. त्याच्यावर मुंबईत दोन तर पुण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. लोढा याच्याकडे आधीच काही नेत्यांच्या अश्लील सीडी असल्याची हवा त्यानेच तयार केली होती. आता मात्र तो सध्या गोत्यात आला असून आता त्याच्याबाबतच विजय वडेट्टीवार यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.

या संदर्भात आज आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, हनी ट्रॅपची व्याप्ती खूप मोठी असून यात 50 आजी-माजी मंत्री तसेच अनेक अधिकारी अडकले आहेत. प्रफुल्ल लोढ हा यातील एक मोहरा असून त्याने काही जणांकडून तब्बल दोनशे कोटी वसुल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.


Protected Content

Play sound