
मुंबई–लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा। कबुतरखान्याचा वाद आणि मांस विक्रीच्या मुद्यावरून आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर टिकास्त्र सोडले.

मुंबईत सध्या कबुतरखान्याचा वादा पेटला आहे. या प्रकरणी कोर्टाच्या निर्देशाच्या नंतरही जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज भाष्य केले. ते म्हणाले की कबुतरांमुळे रोग होतात. यामुळे न्यायालयाने त्यांना खाण्यास टाकू नये असे निर्देश दिले असतांना जैन समाजाने याचे पालन करण्याची गरज आहे. कोर्टाचे निर्देश हे पाळलेच पाहिजे असे अपेक्षित असतांना देखील याचे उल्लंघन होत आहे. यातच लोढा-बिढा सारखी माणसे मध्ये येतात. ते एका समाजाचे नव्हे तर राज्याचे मंत्री असल्याचे लोढा यांनी लक्षात घ्यावे असे राज म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीच्या जाहीर केलेल्या निर्णयावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यामुळे स्वातंत्र्य दिनाला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा आहे. कायद्याने प्रत्येकाला हवे ते खाण्याचे स्वातंत्र दिले असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले.



