Home राजकीय ओबीसी आरक्षण व नवीन प्रभाग रचनांसह होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका !

ओबीसी आरक्षण व नवीन प्रभाग रचनांसह होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका !


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 27 टक्के ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचनांसह होणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यामुळे आता राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर सुनावणी होऊन आज निकाल देण्यात आला. वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या संबंधित दोन याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आदेश दिल्यानुसार, नवीन प्रभाग रचनेनुसारच राज्यातील निवडणुका होणार आहेत.

तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्यात असल्याचे सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound