Home Cities जळगाव Live : आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ ( व्हिडीओ )

Live : आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ ( व्हिडीओ )

0
26

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभेचे भाजपा-शिवसेना-रिपाई(अ) चे अधिकृत उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आज जुने जळगावातील श्रीराम मंदिरात नारळ अर्पण करून आपल्या प्रचारास प्रारंभ केला. पहा याचे लाईव्ह प्रक्षेपण.

 यावेळी शहरातील भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात व आताषबाजी प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी रस्त्यावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. ही रॅली पांजरपोळ, बेंडाळे चौक, महात्मा गांधी मार्केट, टॉवर चौक मार्गांने वसंत स्मृति भाजप कार्यालय येथे प्रचार रॅलीचा समारोप होणार आहे.

रॅलीमध्ये महापौर सीमा भोळे, भाजपा मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, मनपा स्थायी सभापती जितेंद्र मराठे, मनपा भाजप गटनेते भागत बालाणी, नगरसेवक कैलास सोनावणे, मनपा विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, बंडूदादा काळे, नगरसेवक नितीन लढ्ढा, अतुलसिंग हाडा, श्रीकांत खटोड, अस्मिता पाटील, नगसेवक नवनाथ दारकुंडे, प्रशांत नाईक यांच्यासह भाजपचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2327976387525379/

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/381600892567574/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound