अमळनेर प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांवर कच खडी पुर्णतः पसरल्याची बातमी “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज” चॅनलने प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली असून रस्त्याच्या डांबरीकरणाला सूरूवात केली आहे.
निम अमळनेर या मुख्य रस्त्यावर ठीक ठिकाणी वळणावरील रस्त्यांवर रुंदीकरण करण्यात आले आहे. परिणामी वळण असलेल्या जागी कच खडी पुर्णतः पसरल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे, या आशयाचे याबाबत सर्वप्रथम “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज”ने बातमी प्रसारित केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत दोन दिवसात वळण रस्त्यावरील विखुरलेली कच खडी सावरली असून मारवड-अमळनेर दरम्यान सात ते आठ ठिकाणी असलेले वळण रस्त्यावर लागलीच डांबरीकरण चे काम हाती घेण्यात आले आहे. ठिक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना समोर येत होत्या.शिवाय ये-जा करताना या वळणांवर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
दरम्यान लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या बातमीने संबंधित विभागाला जाग आली आणि ही बाब गांभीर्याने घेत, रस्त्यावरील पसरलेली खडी गोळा करून लागलीच डांबरीकरण केले जात असल्याने वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.