लाईव्ह ट्रेंड्स न्युज इफेक्ट : बीडीओंनी दिले भुयारी गटारी चौकशीचे आदेश

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे येथील भुमिगत गटारीच्या निकृष्ट बांधकामाची बातमी ‘लाईव्ह ट्रेंडस न्युज’ चॅनलने प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले आहेत.

तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात भुमिगत गटारीचे बांधकाम सुरू आहेत. मात्र सदर बांधकाम हे विना इस्टिमेट व निकृष्ट दर्जाचे सुरू आहेत. याबाबत ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी लाईव्ह ट्रेंड्स न्युजने वृत्त प्रकाशित केले होते. याची लागलीच दखल घेऊन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी संबंधित अभियंता बी. एम. पाटोळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीअंतीचा अहवाल बीडीओ वाळेकर यांना सादर करावा लागणार असून अहवालात काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामनिधीतून एकादा काम सुरू असेल तर अशावेळी ग्रामस्थांनी चांगल्या दर्जाचे काम करून घेतले पाहिजे. जर काही चुकीचे होत असेल तर त्याला विरोध दर्शवून काम थांबवायला हवा. असे सुतोवाच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

 

Protected Content