https://www.facebook.com/BJP4India/videos/2256740181036518
नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी यांनी ब्रेकींग न्यूज देणार असल्याची घोषणा केली असल्याने देशात उत्सुकता निर्माण झाली आहे. पहा नेमकी काय आहे की ब्रेकींग न्यूज ते !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ट्विट करून आपण देशवासियांना ११.४५ ते १२ वाजेच्या दरम्यान अतिशय महत्वाची ब्रेकींग न्यूज देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता ही बातमी असेल तरी काय याबाबत उत्सुकता निर्माण झाले आहे. दरम्यान, देशवासियांशी संवाद साधण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत कॅबिनेट समितीची बैठक घेतली. यामुळे ते राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत घोषणा करणार असल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मिशन शक्तीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आज आपल्या शास्त्रज्ञांनी एका लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतला. अशा प्रकारे कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. अर्थात, भारताने उपग्रह विरोधी प्रक्षेपास्त्र विकसित केल्याची माहिती त्यांनी दिली.