अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती जिल्हयात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला शेतातील विहीरीत ढकल्याची घटना घडली आहे. शिरजागाव कसबा येथील एका शेतशिवारात एका प्रियकराने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला बेदम मारहाण करून विहिरीत ढकलेले. त्यामुळे प्रेयसीचा मृत्यू झाला असून ही घटना १४ ते १५ मे दरम्यान घडली आहे. शारदा श्रीराम सलाडे असे मृत प्रेयसीचे आहे. तर विनोद सम्मु युवने असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी १६ मे रोजी प्रियकराला अटक केली आहे व त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, शारदाच्या पहिल्या पतीने निधन झाले आहे. दरम्यान त्यावेळी शारदा ही एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होती. तिची ओळख विनोदसोबत झाली. त्यांच्यात प्रेम झाले व त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने काही वर्षांपूर्वीच नोकरी सोडून विनोदसोबत राहण्यास सुरुवात केली होती. विनोद पत्नीला सोडून तो शारदासह राहू लागला. मागील दहा वर्षांपासून लग्न न करता ते दोघे पती पत्नीप्रमाणेच राहत होते. दरम्यान मागील काही वर्षांपासून ते दोघेही कोठारी यांच्या शेतात वास्तव्याला होते. १४ मे रोजी रात्री दोघांमध्ये स्वयंपाकावरून जोरदार वाद झाला. त्यानंतर विनोदने शारदाला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर विहीरीत ढकलून दिले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. दरम्यान ही बाब १५ मे रोजी दुपारी समोर आली. याप्रकरणाची शिरसगाव कसबा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने शारदाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले व तातडीने अचलपूरच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन तिला मृत घोषित केले. याप्रकरणी शारदाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिरसगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून विनोद युवने याला अटक केली आहे.