भुसावळ प्रतिनिधी । महाजनादेश यात्रेसाठी भुसावळात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला प्रारंभ झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांचे आज अमळनेर, पारोळा, धरणगाव आणि जळगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता भुसावळ येथेही नागरिकांना संबोधित केले.
याप्रसंगी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथराव खडसे, ना. हरीभाऊ जावळे खासदार उन्मेश पाटील,खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे यांच्यासह यांच्यासह भाजपाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा । भुसावळ येथे मुख्यमंत्री यांचे लाईव्ह भाषण
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/438264050106482/