रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात जलयुक्त शिवारासाठी शासनातर्फे १२ कोटी ८४ लाख रूपयांचे कामे झाली. मात्र तालुक्यात सरासरी १०० टक्के पाऊस हावूनही तालुक्याच्या पाण्याच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. कोट्यावधी निधी खर्च करून निकृष्ट काम होत असल्याने नेमके जलयुक्त पाणी कुठे मुरले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रावेर तालुक्यात जल युक्त शिवारचे १२ कोटी ८४ लाखांची ४२९ कामे झाली याच दरम्यान तालुक्यात सरासरी शंभर टक्के पाऊस होऊन सुध्दा तालुक्याच्या पाण्याच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. तर सदैव पाण्याखाली असलेल्या तालुक्याला या दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी दहा विहिरी अधिगृहीत करावी लागली होत्या. त्यावेळी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजला सुध्दा कामे निकृष्ट होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. आणि आता शासनानेच जलयुक्त कामांची चौकशी लावलेली आहे. रावेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष निळकंठ चौधरी सांगतात की, जलयुक्त शिवारचे कामे झाली तालुक्यात शंभर टक्के पाऊस होऊन सुध्दा पाणी मुरल नाही माझे स्वता:चे दहा हजार केळीचे खोड पाण्या अभावी फेकून द्यावे लागले होते.तालुक्यात जलयुक्त शिवारचे झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.
तालुक्यात या विभागाने केले कामे
रावेर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे वनविभाग, वन्यजीव विभाग,कृषी विभाग,पंचायत समिती विभाग,जि प लघुसिंचन विभाग तर भुसावळ येथील जलसंधारण विभागाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कामे केली आहे.
रावेर तालुक्यात जलयुक्तचे १२ कोटी ८४ लाखांची झाली कामे
#२०१५/१६ मध्ये ६ कोटी ७४ लाख रुपये खर्च करून १७९ कामे करण्यात आल्या होत्या. यावेळी तालुक्यात तब्बल शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस होऊन सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी शासनाला अधिगृहीत करवावे लागले होत्या.
#२०१६/१७ मध्ये ४ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून १३९ कामे केले होते.तर यावर्षी देखील १०५ टक्के पाऊस झाला होता.
#२०१७/१८ मध्ये १ कोटी २३ लाख खर्च करून ९९ कामे केली होती तर यावर्षी तालुक्यात ९७ टक्के पाऊस होऊन सुध्दा पिण्यासाठी एक विहीर अधिगृहीत केली होती.
#२०१८/१९ मध्ये ३ लाख ६३ हजार खर्च करून १२ कामे करून सुध्दा तालुक्यात पिण्यासाठी २ विहिरी अधिगृहित कराव्या लागल्या होत्या.