यावल येथे भारूडातून साक्षरतेची जनजागृती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुकास्तरीय उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये भारुडातून साक्षरतेची जनजागृती करण्यात आली.या जनजागृतीसाठी डॉ. नरेंद्र महाले लिखित ‘साक्षर जनता भूषण भारता’ या भारुडाचे सादरीकरण करण्यात आले.

भारुडाचे सादरीकरण करत असताना यामध्ये निरक्षरांनी साक्षरतेकडे वळून साक्षर झाले पाहिजे. यावरती प्रकाश टाकण्यात आला. त्याचबरोबर व्यवहारिक ज्ञानात मूलभूत गणित, वाचन, लेखन किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यात आले. त्याचबरोबर अत्यंत मनोरंजक पद्धतीने यावल तालुक्यातील नवभारत साक्षरते अंतर्गत स्वयंसेवकांच्या करवी निरक्षरांनी साक्षर होण्याच्या संदर्भातभारुडात मार्गदर्शन करण्यात आले.

भारुड सादरीकरण करताना यामध्ये सरस्वती विद्या मंदिराचे उपशिक्षक डॉ नरेंद्र महाले ,विद्यार्थी संचित कोळी महाराज ,हर्षल भोसले यांनी सादरीकरण केले. याप्रसंगी विविध विषयांवरती शिक्षकांनी आपले स्टॉल मांडले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड तथा प्रमुख पाहुणे म्हणून निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके ,गटसमन्वयक महंमद तडवी, नवभारत साक्षरता अभियानाचे समन्वयक संदीप मांडवकर, केंद्रप्रमुख,शकिर शेख, डॉ.प्रमोद सोनार,विजय ठाकूर, गिरीश सपकाळे, ललित महाजन,लतिका पाटील, कविता गोहिल,व यावल तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक जळगाव पतपेढी संचालक अजय पाटील, हेमंत पाटील,शबिरुद्दीन शेख उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाने यावल तालुक्यातील प्रत्येक केंद्राने आपले स्टॉल मांडून या ठिकाणी विविध विषयांवरती सादरीकरण केले. प्रसंगी स्वयंसेवक व निरीक्षरांचा देखील सत्कार करण्यात आला.

Protected Content