रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील जिन्सी या आदिवासी भागात आज दुपारी बैलगाडीवर विज पडल्याने दहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील जिन्सी या आदिवासी भागात आज बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यावेळी विजांच्या कडकडाट झाल्याचे बैलगाडीवर विज कोसळली. यात बळीराम दल्लू पवार (वय-२१), दिलीप लक्ष्मण पवार (वय-२१), अरविंद साईराम पवार (वय-१५), ईश्वर दल्लू पवार (वय-१५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय-२०), अनिल लक्ष्मण पवार (वय-२७), बिंदुबाईल लक्ष्मण पवार (वय-५०), साईराम मोरसिंग पवार (वय-३७), मलखान मोरसिंग पवार (वय-४५) आणि लक्ष्मण मोरसिंग पवार (वय-५५) रा. जिन्सी ता. रावेर हे दहाजण जखमी झाले.
जखमींना तातडीने रावेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट घेवून जखमींची विचारपुस केली. किरकोळ जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी सांगितले.