जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि १९ वर्षांपासून फरार असलेला कैदी गोकुळ रावण वाघ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून अटक केली आहे. धुळे येथून शिक्षा रजेवर सुटलेला गोकुळ वाघ पुन्हा कारागृहात हजर झाला नव्हता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोकुळ वाघ , रा. शासकीय दूध डेअरी मागे, धुळे) याने २००६ साली जामीनदार म्हणून आपल्या नातेवाईकांची नोंद करून शिक्षा रजेवर गावी परतला. मात्र, त्यानंतर त्याने कारागृहात न जाता फरार झाला होता. त्यामुळे मेहुणबारे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी त्याचा शोध अनेक वेळा घेतला, मात्र तो मिळून येत नव्हता. अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की तो पुण्यात वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करत आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता धुळे रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी मेहुणबारे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.