Home Cities यावल लेफ्टनंट चैतन्य पाटील यांचा सत्कार

लेफ्टनंट चैतन्य पाटील यांचा सत्कार


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोटन हरचंद पाटील व काशिनाथ हरचंद पाटील यांचे नातू आणि कवी नितीन लोटन पाटील, रणजीत पाटील व प्रफुल्ल पाटील यांचे भाचे चैतन्य गोकुळ पाटील यांनी लष्करी सेवेत मोठे यश मिळवत भारतीय सैन्यात लेफ्टनंट या पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

चैतन्य पाटील यांचे वडील गोकुळ नानू पाटील हे एनआरआय असून त्यांची आई सौ. मनीषा गोकुळ पाटील गृहिणी आहेत. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या चैतन्य यांनी डिप्लोमा व मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली असून, यूपीएससी परीक्षेत उत्तम यश मिळवत ते देशात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी सैन्यात अधिकारी म्हणून स्थान मिळवले असून, सध्या ते राजस्थानमधील जोधपूर येथे सेवेत आहेत.

या यशस्वी युवकाचा इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनीष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी काशिनाथ हरचंद पाटील, कवी नितीन लोटन पाटील, प्रफुल्ल पाटील, सुनील महाजन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चैतन्य पाटील यांच्या या यशाने किनगाव गावासह संपूर्ण यावल तालुका अभिमानाने भारावला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound