मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | निवडणुकीच्या मतदानासाठी फार काही दिवस नाहीत, या निवडणुकीत उघडपणे मतदान होते, त्यामुळे दावा केल्याप्रमाणे फिगर एकदा लोकांसमोर येऊ द्या, असा टोला नाना पटोले यांनी खा. संजय राउताना दिला आहे.
काँग्रेसतर्फे राजस्थानातील इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. यावरून स्थानिक उमेदवार दिला तर कॉंग्रेसला बळकटी मिळाली असती, असे खा.संजय राउत यांनी म्हटले होते.
यावर देशाची एकात्मतेसह त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. आणि काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली आहे. परंतु काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दिवास्वप्नं पाहणारे विरोधक पाहिले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होतात, विरोधकांचा दावा काहीहि असला तरी त्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण या निवडणुकीत मतदान उघडपणे होते त्यामुळे ते दावा करत असलेली मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ द्या, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला अडीच वर्ष पूर्ण होत असून सोनिया गांधींनी तेव्हा किमान समान कार्यक्रमाची भूमिका मांडली होती. तेव्हा हे सरकार कसे झाले, हे सर्वांना माहिती आहे. त्याचा आढावा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.आणि समान कार्यक्रमाची भूमिका पूर्ण झाली कि नाही हे देखील पाहणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.