पारोळ्यातील कुणबी पाटील समाजाला समाज मंदिरासाठी जागा देऊन आईच्या स्मृतींना उजाळा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सूर्यवंशी परिवाराची सामाजिक बांधिलकी संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय मंडळ समस्त कुणबी पाटील समाजाच्या समाज मंगल कार्यालय करिता ओपन स्पेस लगत असलेल्या १००० स्क्वेअर फुट प्लॉट एरिया कै. हिरकणबाई वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ सूर्यवंशी परिवाराने देऊ केली असूनआईच्या स्मृतींना त्यांनी कायमस्वरूपी उजाळा दिला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचेसमस्त कुणबी पाटील समाजासहशहरवासी यांनी कौतुक केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कै. हिरकणबाई वसंत पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचे ८ तारखेला शनिवार रोजी उत्तर कार्य होते. याप्रसंगी कुणबी पाटील समाजाच्या मंगल कार्यालयासाठी आपला देखील हातभार असावाअशी अपेक्षा कै. हिरकणबाई पाटील यांची होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे सुपुत्र देवेंद्र वसंत पाटील, कन्या सुवर्णा वसंत पाटील, महेंद्र वसंत पाटील यांच्यासह परिवाराने आईच्या इच्छापूर्ती व त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी १००० स्क्वेअर फुट जागेचे पत्र समाजाच्या पंचमंडळाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी समाज बांधवांसह नातेवाईक आप्तेष्ट व शहरवासीयांनी त्यांच्या यापरोपकारी भावनेचे कौतुक केले आहे. यावेळी आपल्या शोक संवेदनेतकुणबी पाटील समाज पंचमंडळानेत्यांच्या या दातृत्वाचे आभार व्यक्त केले.

Protected Content