राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे; एकनाथ खडसेंची बाप्पाकडे प्रार्थना

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपा प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे, असे साकडे बाप्पाला घातले आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार खडसेंच्या मुक्ताईनगरमधील घरी बाप्पाची विधीवत स्थापना झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी ही भावना व्यक्त केली.

फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त झाली असून त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे असे साकडे, बाप्पाला घातले असल्याचं खडसे यांनी सांगितले. भाजपामध्ये माझा प्रवेश होईल अशी आशा असल्यामुळे सहा महिने मी स्तब्ध होतो. मात्र आता वारंवार माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात राजकीय स्थिती फारशी चांगली नाही. महागाईने त्रस्त झालेली जनता आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार यावे असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजपामधील प्रवेश रखडल्याचा आरोप केला होता. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आपला भाजपा प्रवेश झाला होतो. तो नड्डा यांनी जाहीर करायला हवा होता. पण फडणवीस आणि महाजन यांनी विरोध केल्यानं भाजपामध्ये प्रवेश झाला नाही. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघं जेपी नड्डा यांच्यापेक्षा मोठे असल्याची खोचक टीका खडसे यांनी केली होती.

 

Protected Content