रावेर(प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे,आ हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थित येथे भाजपाची विस्तृत व चिंतन बैठक सुरु आहे. या बैठकीकडे भाजपाच्या कार्यकर्तानी पाठ दाखवली आहे. बैठक सुरु असलेल्या सभागृहातील निम्या खुर्च्या रिकाम्या होत्या. दरम्यान, विधान भवनातील भावूक भाषणानंतर भाजपाच्या पदाधिका-यांना प्रथमच नाथाभाऊ संबोधित करणार आहे. यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन प्रा सुनील नेवे सभापती सौ माधुरी नेमाडे उपसभापती सौ अनिता चौधरी,जिल्हा परिषद सदस्य सौ नंदाताई पाटील, रंजना पाटील, कैलास सरोदे,माजी शिक्षण सभापती सुरेश धनके,प स सदस्य धनश्री सावळे, कविता कोळी,योगिता वानखेने, हर्षल पाटील भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, भाजपा सरचिटनीस महेश चौधरी, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, पद्माकर महाजन, शहरध्यक्ष मनोज श्रावग आदी गावांचे सरपंच सदस्य लोक प्रतिनीधी भाजपा पदाधीकारी उपस्थित आहेत.