Home Cities जळगाव शेतकरी दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला : दोघे गंभीर जखमी

शेतकरी दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला : दोघे गंभीर जखमी

1 1
1 1

1 1

जळगाव, प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एक शेतकरी दाम्पत्य शेतात काम करत असताना आज (दि.२१) सकाळी १०.०० च्या सुमारास बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भरत सरीचंद चव्हाण (वय ३०) आणि त्यांची पत्नी मनिषा (वय २३) यांचे वरसाडा तांडा शिवारात शेत आहे. शेतात काम करत असताना सकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात भरत चव्हाण यांच्या उजव्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर मनिषा चव्हाण यांच्या कमरेला व हाताला दुखापत झाली आहे. दोघांना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound