मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील ८ रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याचा ठराव आज विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. विधिमंडळाच्या मान्यतेने आता हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे.मध्य रेल्वेवरील २, पश्चिम रेल्वेवरील २ आणि हार्बर रेल्वेवरील ४ स्थानकाचा यात समावेश आहे.
मध्य रेल्वेवरील करीरोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून लालबाग तर सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि चर्नीरोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी , सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या ठरावात करण्यात आली आहे.