जळगाव प्रतिनिधी । धार्मिक भावना दुखावून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्यांच्या विरोधात नवीन कायदा निर्माण करावा अशी मागणी सुन्नी समाजबांधवांनी केली असून याबाबतचे निवेदन आमदार राजूमामा भोळे यांना देण्यात आले.
सुन्नी समाजबांधवांनी आज आमदार राजूमामा भोळे यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची व महात्म्यांची भूमी आहे. एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याबाबत महाराष्ट्र नेहमी आदर्श राज्य राहिले आहे. अनेक जाती धर्माचे, पंथांचे लोक येथे वास्तव्य करीत असताना एकमेकांच्या भावभावना व धार्मिक चालीरीतींचा आदर करीत आल्याचा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायद्यात संशोधन व नवनवीन कायदे निर्माण करण्याच्या बाबतीत देशात मार्गदर्शक भूमिका निभावत असतो. गेल्या काही वर्षांपासून अनेक राज्यातून काही समाजकंटकांनी मार्फत विविध धर्माच्या धार्मिक भावना व विशेष करून इस्लामचे आदरणीय प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे अनादर करून मुस्लिमांच्या व अन्य धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने तसेच धार्मिक चालीरिती व धार्मिक महा पुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विटंबना करणार्याच्या राज्याची व देशाची एकात्मता व सामाजिक सद्भावना यास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यात पुढे नमूद केले आहे की, असे गैर प्रकार आपल्या महाराष्ट्र राज्यात घडू नये म्हणून आम्ही सदर निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की, कोणत्याही समाज घटकाकडून व व्यक्ती कडून कोणत्याही धर्मा विरोधात किंवा स्वधर्मा विरोधात तसेच धार्मिक श्रद्धा असलेल्या महापुरुषांच्या किंवा धर्मसंस्थापक यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, लेखन, चित्रण अथवा प्रकाशन हे कायदेशीर गुन्हा ठरवून त्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी. जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना आहात करण्याची तसेच सामाजिक सद्भावना बिघडविण्याचे साहस कोणी समाजकंटक करणार नाही. भारतीय दंड संहितेत तशी तरतूद आहे, परंतु त्यात कठोर शिक्षेची तरतूद मात्र दिसून येत नाही. त्यामुळेच कदाचित असे अनुचित प्रकार घडत आहेत, करिता कोणाचीही सामाजिक, जातीय व धार्मिक भावना दुखावणार्या व्यक्तींविरोधात स्वतंत्र कायद्याची निर्मिती करून त्यात गुन्ह्याचे स्वरूप दखलपात्र, अजामीनपात्र, तसेच दहा वर्षापर्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी.
उपरोक्त विषयाचे गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कायद्यात तरतुदी करून राज्यात सदर कायदा लागू करून जनतेस आश्वस्त करावे व इतर राज्यांत समोर एक आदर्श व मार्गदर्शक भूमिका निभावणे पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विधानसभेत सदर प्रस्ताव आल्यावर त्यास समर्थन देऊन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधव यांनी या निवेदनाद्वारे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे साकडे घातले आहे.
या शिष्टमंडळात सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व मरकज सून्नी जामा मशिद जळगाव चे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, हाजी मुक्तार शहा, शेख नूरुद्दीन, अफजल मनियार, सय्यद जावेद, मुस्तकीम बहेस्ती, शेख शफी, सय्यद उमर, नाजीम पेंटर, अब्दुल मुस्तकीम, शेख दानिश इत्यादी उपस्थित होते.