Home Cities जळगाव वारसा कर्तृत्वाचा, आशीर्वाद जनसामान्यांचा!; प्रभाग ४ मध्ये जल्लोषात निघाली पियुष कोल्हे यांची...

वारसा कर्तृत्वाचा, आशीर्वाद जनसामान्यांचा!; प्रभाग ४ मध्ये जल्लोषात निघाली पियुष कोल्हे यांची प्रचार रॅली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. प्रचारासाठी हातात अवघे काही तास शिल्लक असताना, प्रभाग ४ ‘ड’ मधील महायुतीचे (शिवसेना – शिंदे गट) उमेदवार पियुष ललित कोल्हे यांनी प्रचाराचा प्रचंड धडाका लावला आहे. रविवारी सकाळी आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीने संपूर्ण प्रभागात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे.

प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक :
प्रचाराची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आली. स्थानिक श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतल्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, “शहराच्या विकासासाठी आणि महायुतीचे हात बळकट करण्यासाठी पियुष कोल्हे यांच्यासारख्या तरुण आणि अभ्यासू नेतृत्वाला बहुमताने विजयी करा.”

कर्तृत्वाचा वारसा आणि जंगी स्वागत :
पियुष कोल्हे यांना या प्रभागात मोठा कौटुंबिक वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा आणि पणजोबा या दोघांनीही याच प्रभागातून नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करत विकासाची मोठी कामे केली आहेत. आजही त्यांच्या कामाचा प्रभाव मतदारांच्या मनावर दिसून येत आहे. रॅली दरम्यान ठिकठिकाणी पियुष कोल्हे यांचे स्वागत करण्यासाठी महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली, तर भगिनींनी औक्षण करून त्यांना विजयाचा टिळा लावला.

ढोल-ताशांच्या गजरात शक्तीप्रदर्शन :
ढोल-ताशांचा कडकडाट आणि “विजयी असो” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ही रॅली केवळ प्रचाराचा भाग नसून ते एक मोठे शक्तीप्रदर्शन ठरले. महायुतीचे विविध स्तरांवरील नेते, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या रॅलीत सक्रिय सहभाग घेतला. पियुष कोल्हे यांनी प्रत्येक गल्लीत जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि तरुणांच्या हाताला हात देऊन विकासाचे वचन दिले. प्रचाराचा वेळ संपण्यापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार पियुष कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. या भव्य प्रतिसादामुळे प्रभाग ४ मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound