Home क्राईम एलईडी बल्ब विक्रेत्याला दोघांकडून मारहाण

एलईडी बल्ब विक्रेत्याला दोघांकडून मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मानराज पार्क जवळ एलईडी बल्ब जास्त दाराने विक्री करत असल्याच्या संशयावरून विक्रेत्याला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, युनूस शेख बशीर (३० रा. पिंप्राळा हुडको) हे आपल्या परिवारासह राहतात. एलईडी बल्बची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. जळगाव शहरातील  मानराज पार्क जवळ शुक्रवारी २० आक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एलईडी बल्ब विक्री करत होते. त्यावेळी सुनील शांताराम पाटील (४२, रा. पिंप्राळा हुडको), शंभू सुभाष पाटील (३१, रा. केदार नगर) हे तिथे आले.

दरम्यान युनूस शेख हे एलईडी बल्ब जादा दराने विक्री करत असल्याचा संशयावरून दोघांनी शेख यांना बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापुराव बडगुजर करीत आहे.


Protected Content

Play sound