पारोळा प्रतिनिधी- भारतीय संविधानाला 70 वर्ष पुर्ण झाल्याने आज संविधान जागृती अभियाना अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ आणि किसान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘भारतीय नागरिक या नात्याने आपली मूलभूत कर्तव्य’ या विषयावर किसान महाविद्यालयातील प्रा. शशी पाटील यांचे व्याख्यान झाले.
भारतीय संविधानाला 70 वर्ष पुर्ण झाल्याने आज संविधान जागृती अभियाना अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ आणि किसान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘भारतीय नागरिक या नात्याने आपली मूलभूत कर्तव्य’ या विषयावर किसान महाविद्यालयातील प्रा. शशी पाटील यांचे व्याख्यान झाले.
सुवर्ण सिंह समितीची शिफारस, 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीनुसार, भाग-4 कलम 51/क मध्ये समावेश, 3 जानेवारी 1977 पासून अंमलबजावणी, तर भारतीय अकरा मूलभूत कर्तव्य पुढील प्रमाणे १)भारतीय संविधान संविधानिक संस्था राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा सन्मान राखणे,२) भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणादायी ठरलेल्या तत्त्वांचे पालन करणे,३) देशाचे सार्वभौमत्व अखंडता आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे,४) राष्ट्रीय आपत्ती आणि संकटकालीन परिस्थितीत देश सेवेसाठी सदैव तत्पर राहणे,५) जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, आणि संपत्तीच्या आधारे कुठलाही भेदभाव न करणे आणि स्त्रियांच्या सन्मानविरोधी असलेल्या प्रथांचा त्याग करणे,६) देशातील सांस्कृतिक वारसहक्काचे जतन करणे सामाजिक रूढी परंपरा जोपासणे,७) देशातील पर्यावरणाचे संरक्षण करणे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे,८) वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आणि विकासवादी विचारांची कास धरणे,९) देशातील सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणे,१०) देशाच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर राहणे,११) सहा ते चौदा वयोगटातील पाल्यांना शाळेत पाठविण्याची जबाबदारी प्रत्येक पालकांची असेल.असे अकरा मूलभूत भारतीय कर्तव्य भारतीय नागरिक म्हणून या कर्तव्यांची जाणीव ठेवली पाहिजे असे प्राध्यापक शशी पाटील यांनी सांगितले.
सदर व्याख्यान 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 हे वर्ष संविधान वर्ष म्हणून राबवले जात असल्याने सदर कार्यक्रम घेण्यात आला. या व्याख्यान प्रसंगी न्यायाधीश प्रकाश महाळणकर,न्यायाधीश एम के पाटील,वकील संघ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.