यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विभाजन विभिषिका स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल पाटील होते तर अध्यक्षस्थानी डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.
विभाजन विभिषिका स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. अनिल पाटील यांनी फाळणीच्या संदर्भातील एक वेदनादायी फाळणीची घटना या विषयावर सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विचार व्यक्त केली की १९४७ साली जी जाती – धर्मामुळे जखम निर्माण झाली. ती पुन्हा कोणत्याही देशात निर्माण होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, हजारो शहीदांच्या बलिदानामुळे आपला देश स्वतंत्र झाला आहे, ते स्वातंत्र्य टिकवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर आभार प्रा. एम. डी. खैरनार यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, डॉ. सुधा खराटे, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, मिलिंद बोरघडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.