यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू. ए.सी. विभाग आणि संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ऍडव्हान्स कॉम्प्युटर्स स्किल” या विषयावर शुभांगी बडगुजर आणि यश बडगुजर यांचे व्याख्यान, प्राचार्य डॉ. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. आर. डी.पवार उपस्थित होते.
बडगुजर यांनी म्हटले की जग हे आधुनिकतेकडे वाटचाल करत असून त्या प्रवाहात चालणे हे विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. याप्रसंगी यश बडगुजर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की संगणकाबद्दलचे आधुनिक ज्ञान कौशल्य आत्मसात करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी गरजेचे आहे.
याबाबत आदी उपस्थित मान्यवरांनी ही कार्यक्रमास विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. के. पाटील यांनी केले तर आभार संगणक विभाग प्रमुख प्रा. ईश्वर पाटील यांनी मानले. संपुर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञानच्या संगणक विभाग व आय. क्यु.ए .सी विभागाच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.