जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडा; शिवसैनिकांची भूमिका ( व्हिडीओ )

chalisgaon shivsena

चाळीसगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी अन्यथा भाजपाच्या उमेदवाराचे काम करणार नाही. चाळीसगाव शिवसेनेची पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सुटेल आणि यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असा आदेश शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी दिल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर निवडणुकीची तयारी केली आहे.

 

ही निवडणूक लढण्यासाठी शिवसैनिक प्रत्येक तालुक्यात सक्षम असुन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आर.ओ.तात्या पाटील यांनी हा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांसोबत पिंजून काढला. बूथप्रमुख पासून ते शाखा प्रमुख कार्यकर्ते या प्रत्येकाची संपर्क साधला असल्याने सर्व शिवसैनिकांची हा मतदारसंघ आपल्याला सोडावा, अशी त्यांनी मागणी असल्याने अशा मागणीचे निवेदन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना देण्यात येणार आहे. ही जागा आम्हाला सोडावी अन्यथा भाजपाच्या उमेदवाराचे प्रचार आम्ही करणार नाहीत, अशी ठोस भूमिका चाळीसगाव शिवसैनिकांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले.

Add Comment

Protected Content