जळगाव, प्रतिनिधी | समाजात मिळणारे शिक्षण हे वर्गात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा अत्यंत प्रभावी असते. तसेच आपण समाजाचा आरसा न होता नेतृत्व व्हावे असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी के.सी.ई. सोसायटी च्या अमृत महोत्सवानिमित्त रविवार १५ रोजी मू.जे महाविद्यालयातील जुन्या कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यक्रमात केले.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्याशी अशी विविध संस्थाचालक, प्राचार्य,प्राध्यापक यांना चर्चा करता यावी यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना ते म्हटले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने “ दहा व्हर्टीकल” असलेला प्रोग्राम सुरू केलेला आहे. डॉ. कस्तुरी नंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेल्या त्या समितीने “लिबरल एज्युकेशन” ही संकल्पना मांडली आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था आणि गुणवत्ता तसेच सर्वांगीण विकास याबाबी केंद्रस्थानी मांडण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी “नॅशनल अकॅडमी क्रेडिट बँक” स्थापन करण्यात येणार आहे. पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दीक्षा आरंभ” सोहळ्याचे आयोजन संस्थांनी करायला हवे असे सांगितल. ज्या महाविद्यालयांना नँक ची ए श्रेणी मिळवली असून त्या महाविद्यालयांनी इतर महाविद्यालयांनी टी श्रेणी मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेच मार्गदर्शन करावे यासाठी युजीसी ने “परामर्श” हि योजना सुरु केली आहे. प्रास्ताविक मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी तर मान्यवरांचा परिचय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी केला. के.सी.ई.चे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी भूषण पटवर्धन यांचे स्वागत केले. तसेच मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी यांनी प्रज्ञावंत नंदकुमार जी बेंडाळे यांचे स्वागत केले. यावेळी प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे यांनी संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले. त्यानंतर खुली चर्चा झाली. यावेळी विविध महाविद्यालयांचे संस्थाचालक तसेच प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार योगेश महाले यांनी केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/498104171012575/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2217468025212358/