Home क्राईम सराफाला मारहाण करून जबरी लुट करणारा आरोपी एलसीबीच्या ताब्यात

सराफाला मारहाण करून जबरी लुट करणारा आरोपी एलसीबीच्या ताब्यात


LCB karwai

जळगाव प्रतिनिधी । यावल येथे सराफाच्या दुकानाला कुलुप लावून परत जाणाऱ्या सराफा व्यवसायिकास चौघांनी मारहाण करून साडे सात लाखांचा सोने व चांदीचे ऐवज लुटल्याची घटना 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. यातील एका आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून त्यांच्या ताब्यात एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल शहरात 14 एप्रिल रोजी सकाळी 3.27 वाजेच्या सुमारास सराफ व्यवसायीक श्रीनिवास नंदकिशोर महालकर (वय-42) हे आपले सराफाचे दुकान बंद करून घरी परतत असतांना अरोपी आकाश सुरेश सपकाळे रा. जळगाव, गौरव भरत कुवर (वय-19) रा. कासमवाडी जळगाव, चेतन कोळी रा. यावल आणि यश उर्फ गोलू पाटील रा. यावल यांनी सराफ व्यवसायीक श्रीनिवास यांना बॅग घेवून जात असतांना मारहाण करीत हातातील बँग हिसकावून घेतली. बँगेत ठेवलेली 5 लाख 62 हजार 600 रूपयांचे सोन्याचे दागीने आणि 2 लाख 23 हजार 600 रूपयांचे 7 किलो 570 ग्रॅम चांदी असे एकुण 7 लाख 86 हजार 200 रूपयांचा ऐवज लूटून नेला होता. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात भाग 5 गुरनं 45/2019 नुसार 394, 341, 324, 34 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी केली कारवाई
यातील आरोपी गौरव भरत कुंवर हा जळगाव येत असल्याची माहिती पोलीस अधिकक्ष डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथक तयार केले. या पथकात पोउनि सुधाकर लहरे, पोहेकॉ शरीफ काझी, पोना युनूस शेख, पोना सुरज पाटील, पोकॉ दत्तात्रय बडगुजर, प्रकाश महाजन, चालक पोकॉ दर्शन ढाकणे यांनी पांडे चौकात सापडा रचुन आरोपी गौर भरत कुवर याला मोठा शिताफीने अटक केली. त्याची कसून चौकशी व तपासणी केली असता त्याच्याकडून बनावट एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली आहे. याबाबत आरोपी गौरव कुंवर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound