जळगाव प्रतिनिधी । अपहरणप्रकरणाच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, समाधान जालम गायकवाड आणि प्रविण ईसा भिल दोन्ही रा. तरवाडे पेठ ता. चाळीसगाव यांच्या विरोधात अपहरण केल्याप्रकरणी चार वर्षांपुर्वी चाळीसगाव शहर पोलीसात भाग 5 गुरनं 134/2015 भादवी 363/34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी समाधान गायकवाड हा मुळगावी तर दुसरा प्रविण भिल याला ईसापुरी ता. मालेगाव येथे आला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पोउनि सुधाकर लहारे, पोहे कॉ रामचंद्र बोरसे, पोहेकॉ नारायण पाटील, पोहेकॉ बापु पाटील, पोना मनाजे दुसाने, पोना किरण चौधरी, पोकॉ दत्तात्रय बडगुजर, महेश पाटील, चालक पोकॉ अशोक पाटील अशांचे पथक तयार करून दोन्ही आरोपीला मुळगावाहून ताब्यात घेतले. असून पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.