Home Cities जळगाव ‘एलसीबी’चा चार्ज राहूल गायकवाडांकडे : संदीप पाटलांची तातडीने उचलबांगडी !

‘एलसीबी’चा चार्ज राहूल गायकवाडांकडे : संदीप पाटलांची तातडीने उचलबांगडी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलेच्या अत्याचाराच्या आरोपांनी गोत्यात आलेले एलसीबीचे निरिक्षक संदीप पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांचा चार्ज राहूल गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एलसीबीचे प्रमुख पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी एका महिलेला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण उपस्थित केले. यानंतर संदीप पाटील यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यावर आमदार चव्हाण हे स्वत: लक्ष ठेवून आहेत.

तर दुसरीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी आदेश काढून संदीप पाटील यांची एलसीबीच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविले. तर त्यांचा प्रभार हा जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे राहूल गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound