जळगाव प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातून फरार असलेला संशयित चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री कोंबींग ऑपरेशन दरम्यान अटक केली आहे. संशयित आरोपीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सायबोद्दीन उर्फ सायब्या शेख नजमोद्दीन शेख (रा. परपोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगांव) असे चोरट्याचे नाव असून त्याला जळगाव शहरातील बळीराम पेठ भागातील शिवाजी चौक काट्याफाईल भागातून पळून जाण्याच्या बेतात असतांना चोरीच्या गॅस सिलेंडरसह ताब्यात घेण्यात आले आहे. बळीराम पेठ भागातील रहिवासी अराफत अहमद यांच्या घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये प्रवेश करीत २ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान साहेब्या याने सिलेंडर चोरुन नेले होते. गॅस सिलेंडर चोरीप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्य मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. जितेंद्र पाटील, पो.हे.कॉ.विजयसिंग धनसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, पो.हे.कॉ.विलास बाबुराव पाटील, पो.ना. नितीन प्रकाश बाविस्कर, पो.ना.राहुल जितेंद्रसिंग पाटील, पो.ना. प्रीतम पितांबर पाटील यांच्या पथकाने सायबोद्दीन यास मुद्देमालासह अटक केली. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.