जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयएमआर कॉलेज समोरील रोडवर पार्कींगला लावलेली वकीलाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी ८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रविवारी ९ जून रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश बन्सीलाल रूनवाल वय ४९ रा. पटेल नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वकीलीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी ८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता ते जळगाव शहरातील आयएमआर कॉलेजसमोर दुचाकी (MH-19 BW-8724) ने आलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांना दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुवर्णा तायडे ह्या करीत आहे.