पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील गावकऱ्यांनी लसीकरण केंद्राची मागणी केली होती. या मागणीची पूर्तता जि. प. सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पूर्ण करण्यात येऊन त्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
लसीकरणबाबत आरोग्य समितीने चांगले नियोजन केल्याने गोंधळ निर्माण झाला नाही. सकाळीच एक ते पन्नास लोकांना ग्रामपंचायतीचा शिक्यानिशी टोकन देण्यात आले होते. यावेळी ५० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे गोंधळ न होता ग्रामस्थांना शांततेने लस देण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. गोकुळ शिरसाट, आरोग्य सेविका वैशाली परदेशी, सरपंच भरत राठोड, उपसरपंच रज्जाक तडवी, पोलीस पाटील दत्तू पाटील, ग्रामसेवक के.डी. पवार, ज्ञानेश्वर चौधरी, डी. आर. वाघ, शंकर पवार, बहादूर पाटील, हिलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.