जळगाव, प्रतिनिधी | आज आचार्य तुलसी डायग्नोसिस सेंटर व डेंटल केअरचा आज शुभारंभ करण्यात आला. अखिल भारतीय युवक परिषदेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच्या उद्घाटन प्रसंगी आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे उपस्थित होते.
अखिल भारतीय युवक परिषदेतर्फे संपूर्ण भारतात हा उपक्रम राबविण्यात येत असतो.यानुसार जळगाव शहरात त्याची ४४ वी शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विमल कटारिया, महामंत्री संदीप कोठारी, हिमत शेठीया, रितेश छाजेड, जयेश लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना साध्वी श्री निर्वाणश्रीजी आदी ठाणा यांचे अनमोल मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला.