पाचोरा, प्रतिनिधी | येथील आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील बाम्बरूड (महादेवाचे) येथे गिरणा नदीवर ८५ लक्ष निधी मंजूर करून साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचे आज (दि.२१) त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात येवून साडी चोळी व नारळ वाहून जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी अॅड. दिनकर देवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, जिल्हा समन्वयक पप्पु राजपूत, धर्मा आबा, नीलकंठ पाटील, भोला पाटील व संजय पाटील हे उपस्थित होते.