फैजपुर प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार, आमदार व माजी जिल्हा अध्यक्ष स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भाजपतर्फे अभिवादन करण्यात आले.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेला नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात दिली. यावेळी भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, माजी नगराध्यक्ष बी के चौधरी, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, कामगार अध्यक्ष किरण चौधरी, राजू महाजन, नरेंद्र चौधरी, राजाभाऊ चौधरी, बबलू महाजन, नितीन नेमाडे, रवींद्र होले , वसंत परदेशी, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, पिंटू तेली, पप्पू चौधरी, जयश्री चौधरी, संजय भावसार या सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.