
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्व. गोदावरी आई यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (१ एप्रिल) भावपूर्ण वातावरणात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. गोदावरी फाउंडेशनच्या प्रेरणास्थान असलेल्या गोदावरी आई यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या सामाजिक योगदानाला अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी पुष्प अर्पण करत त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना समाजसेवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे विशेषत्वाने स्मरण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. चंदन साबळे, डॉ. एम.डी. अब्दुल्ला, डॉ. अलोककुमार यादव, डॉ. रणधीर पांडे, डॉ. योगेश तायडे, डॉ. वैभव पालीवाल, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. पंकजा बेंडाळे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. यासोबतच महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक अनंत इंगळे आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
गोदावरी आई यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहनही उपस्थितांकडून करण्यात आले. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची जाणीव नव्या पिढीला होते, असे मत व्यक्त करण्यात आले.



