Home Cities अमळनेर अमळनेरात स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभरा; आ. अनिल पाटलांना निवेदन

अमळनेरात स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभरा; आ. अनिल पाटलांना निवेदन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात उभारण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. महसूल इमारत, प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती इमारत, एसटी कार्यशाळा तसेच निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरण यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

तालुक्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा असल्याने तालुक्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील परिसरात त्यांचे स्मारक किंवा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या मागणीसाठी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदन देतेवेळी मुख्तार खाटीक, विनोद कदम, इम्रान खाटीक, आलिम मुजावर, सचिन पाटील, राहुल गोत्राळ, कैलास पाटील, गोविंदा बाविस्कर, निलेश देशमुख, अर्षद खाटीक, भूषण पाटील, अनिल शिसोदे, सुलतान खाटीक, मधुकर पाटील, महेंद्र पाटील, किशोर देसले, जाकीर खाटीक, निखिल पाटील, पंकज जैन, जे. व्ही. बाविस्कर, एन. जे. पाटील, एस. जी. बत्तीसे, एस. आर. शिंगाणे, चेतन बोरसे, भैय्या वाघ, बाबा खाटीक आणि गौरव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound