लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

lata didi

मुंबई वृत्तसंस्था । जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. लतादीदींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, लतादीदी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला समोर येत असलेल्या माहितीनुसार मंगेशकर कुटुंबीय रुग्णालयात त्यांच्यासोबत असल्याचे कळते आहे. लता मंगेशकर 90 वर्षांच्या आहेत. सविस्तर माहिती लवकरच….

Protected Content