यावलातील नागरी अंगणवाडीत पोषण आहारात अळ्या; पालकांमध्ये तीव्र संताप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील सुतार वाड्यातील शहरी विभागाच्या ७६ क्रमांकाच्या अंगणवाडीतील पोषण आहारात बारीक पांढऱ्या रंगाच्या आल्या निघाल्याने संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविकेस जाब विचारत एकच कलह केला. दरम्यान या वेळी संतप्त नागरिकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी भुसावळ यांचेकडे तक्रार करत बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी अंगणवाडीस भेट देत पंचनामा केला असून, संबंधित ठेकेदार व पुरवठा दारावर दोन दिवसात कारवाई करण्याची लेखी आश्वासन दिले आहे.

यावल येथील सुतार वाड्यात असलेल्या ७६ क्रमांकाच्या शहरी अंगणवाडी मधील पोषण आहारांतर्गत देण्यात आलेल्या वरणामध्ये पांढऱ्या अळ्या आढळून आल्याने संत पालकांनी बुधवारी अंगणवाडीत जात सेविकेस जाब विचारत धारेवर धरले दरम्यान पालकांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ अंगणवाडीस भेट देत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनाघटनेची दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भुसावळ विभागीय शहरी अंगणवाडीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी भेट देत अंगणवाडीस पुरवलेल्या पोषण आहाराचा पंचनामा केला आहे.

अंगणवाडीचा पोषण आहार कोणी शिजवला याचे उत्तर देताना वारंवार सेविका वेगवेगळे नाव सांगत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता .बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसात चौकशी करून संबंधित ठेकेदार व पुरवठादार यांचे वर कारवाई करण्याची लेखी आश्वासन पालकांना दिले आहे अन्यथा प्रशासन त्यास जबाबदार राहील असेही लिहून दिले आहे. तक्रारकर्त्यांमध्ये बाळा कोळी, आकाश चचोपडे संजय नन्नवरे, चेतन आढळकर ,दत्तात्रय कोळी, योगिता कोळी, माया कोळी, पुंडलिक बारी यांचा समावेश होता अंगणवाडी पोषण आहारा संदर्भात दोन दिवसात कारवाई न केल्यास पालकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Protected Content