फैजपूर प्रतिनिधी । जयतु जयतु हिंदुराष्ट्रम, वंदे मातरम, भारत माता की जय, देश की रक्षा कोन करेगा, हम करेंगे हम करेंगे, देश के सन्मान मे हम है मैदान में, अशा घोषणांनी शुक्रवारी फैजपूर शहर दणाणले होते. शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने नागरी सुधारणा कायदा समर्थनार्थ शहरातून भव्य 75 मीटर लांबीच्या तिरंगी ध्वजाची रॅली काढण्यात आली होती.
शहरातील हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या खंडेराव वाडी येथून संध्याकाळी 4 वाजता भारत मातेचे प्रतिमापूजन महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, शास्त्री माणेकरबाब, माजी आ. हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या हस्ते पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली खंडेराव वाडी, जुने हायस्कुल, राम मंदिर, खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, छत्री चौक या मार्गे प्रांतकार्यालयावर समाप्ती झाली. मुख्य मार्गाने हा मोर्चा घोषणा देत प्रांतकार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात.
दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे की, पाकिस्तान, अफगणिस्तान व बांगलादेश येथील धार्मिक अत्याचार पीडित निर्वासित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी व ईसाई बांधवांना नागरिकत्व देण्यासंदर्भात भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक असे नागरिकता संशोधन विधेयक बहुमताने पारित झाले आहेत. मा. राष्ट्रपती महोदय या विधेयकावर आपली स्वाक्षरी होऊन रुपांतर नागरिकता संशोधन कायद्यात झालेले आहे नागरिकता संशोधन कायद्याचे आम्ही सर्व परीसरातील सर्व विद्यार्थी महिला पुरुष व सर्व समाज आणि व्यापारी संघटना स्वागत व समर्थन करतो देशात नागरिकत्व सुधारणा कायदा समजून न घेता केवळ गैरसमजातून विरोध होत आहे. या कायद्याला समर्थन देण्यासाठी व त्याची राज्यात अंमलबजावणी व्हावी, यासाठी फैजपूर येथे शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचकडून संध्याकाळी 4 वाजता महामोर्चा काढण्यात आला. खंडेराव वाडी येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात आजूबाजू परिसरातील मोठ्या संख्येने युवक व महिला सहभागी होते. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कायद्याचे स्वागत केले जात असताना काही लोक स्वतःला थोर विचार वादी समजणारे या कायद्याच्या विरोधात जाऊन देशात अराजकता मारण्याचे काम व काही संघटना करत आहेत अर्धवट व चुकीची माहिती पसरवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार कळविण्यात येत आहे.
75 मीटर तिरंगा ध्वज धरलेले तरुण
या अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती व संघटना व योग्य ती चौकशी करून गुन्हा नोंद करावेत व कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकता संशोधन कायदा समर्थन देऊन दिली आहे. शिस्तप्रिय मोर्चाने शहरवासीयांची मने जिंकली, नागरिकत्व संशोधन कायदा समर्थनासाठी आज फैजपूर शहरातुन भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. तसेच सुरवातील महिलांची उपस्थिती त्यानंतर 75 मीटर तिरंगा ध्वज धरलेले तरुण त्यांच्या पाठीमागे नागरिक अतीशय शिस्तप्रिय असे नियोजन करून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून या मोर्चाचे स्वागत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, शास्त्री मनेकर बाबा, भास्कर बाबा महाराज, प्रावीदासजी महाराज, माजी आ.हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष महानंदा होले, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, भाजप पालिका गटनेते मिलिंद वाघुळदे, मसाका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, माजी नगरसेवक संजय महाजन, उद्योजक मोजनकुमार पाटील, जितेंद्र पवार, हर्षल पाटील, विलास चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेंगडे, डॉ.कुंदन फेगडे, डॉ.गणेश भारंबे, डॉ.नितीन महाजन, डॉ.सुनील पाटील, डॉ.भरत महाजन, डॉ.भाग्यश्री महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, अमोल निंबाळे, देवा साळी, नितीन राणे, दिव्यांग बांधवांचे अध्यक्ष नाना मोर्चा यासह 15 हजारच्या वरती संख्या होती.
यांनी घेतले परिश्रम
राष्ट्रीय सुरक्षा मंच अध्यक्ष संदीप भारंबे, उपाध्यक्ष अनिल तेली, अनिरुध्द सरोदे, राजू महाजन, टेकचंद होले, दीपक पाटील, प्रशांत होले, प्रफुल कासार, यासह शहरातील महिला व पुरुष तरुण मोठ्या संख्यने उपस्थित होते. डिवाएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे, पीएसआय साहेबराव पाटील, शिंदे यासह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.