एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधीतुन ३ लक्ष रुपये किमंतीचे गांव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
याआधी देखील गांव अंतर्गत रस्ता कांक्रीटीकरण कामे देवुन पुर्ण करण्यात आलेली आहेत. यानंतर देखील गावाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही असे आश्वासन आमदार डॉ.सतिष पाटील यांनी यावेळी दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हासरचिटणीस डॉ. राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, सरपंच शांताराम भिल, धरणगांव मार्केट कमेटीचे उपाध्यक्ष महारु पाटील, माजी सरपंच आनंदा धनगर ,गोपाल पाटील,जयविर पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,एन.डी.पाटील, सर्व ग्रा.प.सदस्य गावांतील सर्व पदाधीकारी ग्रामस्थ उपस्थीत होते.